काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
“आपल्यासाठी महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाची दारे खुली केली. कोणाला सरस्वती, तर कोणाला शारद आवडते. पण, आम्ही यांना पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही. या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण दिलं. म्हणून ते माझे देव आहेत, तेच तुमचेही देव असले पाहिजेत,” असं भुजबळ यांनी म्हटलं.
हेही वाचा : “ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
“सगळ्यांना का नाही शिकवलं?”
“आपण ज्यांचा फोटो लावतो, त्यांनी किती शाळा काढल्या? किती लोकांना शिकवलं? शिकवलं तर सगळ्यांना का नाही शिकवलं? हे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत,” असं छगन भुजबळ म्हणाले.
“मुद्दामन संभाजी भिडे नाव ठेवण्यात आलं”
“संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामन संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.