प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसाठी नगरसूल तसेच येवला रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक ‘ योजनेत सामावेश करून या स्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा, अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>जळगावातील रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी; मुंबईतील बैठकीत निर्णय

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
dombivli railway station marathi news, mp shrikant shinde marathi news
डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती

भुजबळ यांनी मंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. भारतीय रेल्वे देशभरातील २४७ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करणार आहे. रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे विभागातून प्रत्येकी दोन स्थानक निवडून त्यांचा विकास पहिल्या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागातून नगरसूल स्थानकाचा विकास प्राधान्याने करावा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास येवल्याच्या पैठणीचा वन स्टेशन वन प्रोडक्ट धोरणातंर्गत नगरसूल स्थानकात समावेश करण्यात येईल.

हेही वाचा >>>नाशिक: पंचवटीतील काही भागात दोन दिवस पाणीबाणी; गळती लागलेल्या जलवाहिनीची गुरूवारी दुरुस्ती

भारतीय रेल्वे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एक हजार छोट्या रेल्वे स्थानकांचा विकास करणार आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक विभागातून १५ स्थानके निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून येवला स्थानकाचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. या स्थानकातील फलाट क्रमांक दोनचा विकास करुन रेल्वेपूल करावा, माल साठवणुकीसाठी गुड्स शेड उभारून गुड्स फलाट बांधावे. तसे केल्यास येवला स्थानकात मंजूर खत डबे कार्यान्वित होऊन खताची वाहतूक करण्यास मदत होणार आहे. तसेच सद्या येवल्यासाठी असलेल्या खताचे जे डबे मनमाड, नांदगाव येथे उतरविले जातात, ते येवल्यात उतरविले जातील.

हेही वाचा >>>धुळ्यातील तीन अनाथ बालकांचे दत्तक विधान – एक बालक इटलीला जाणार

येवला, नगरसूल या स्थानकात देशभरातून शिर्डीसाठी जाणारे भाविक उतरत असतात. तसेच या परिसरात शेतमालाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने या स्थानकांचा विकास प्राधान्याने करण्याची नितांत आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने सुरु केलेल्या अमृत योजनेमध्ये या स्थानकांचा समावेश करून त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.