आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता का, याचे उत्तर राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून जनतेनेच दिले आहे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजप-शिंदे गटाला घवघवीत यश मिळाले. ही अवघ्या दोन-अडीच महिन्यांच्या काळात आमच्या सरकारला मिळालेली पोचपावती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. उन्मेष पाटील यांसह जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा धक्का; प्रवीण तिदमे यांची नाशिकच्या महानगरप्रमुख पदी नियुक्ती

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी शिवसेनेला गिळायला निघाला आहे. आता शिवसेना शिल्लक राहणार नाही. झोपलेल्या माणसाला जागे करू शकतो. मात्र, झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करता येणार, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लावला. २०१९ च्या निवडणुकीत आम्ही भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढलो होतो. युती म्हणून जनतेने निवडून दिले. त्यामुळे सरकार कोणाबरोबर स्थापन करायला हवे होते, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित जनतेला केला.