नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून निर्माण झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी रात्री ही घटना घडली होती. दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुरोहित संघाने संशयितांवर कारवाईची मागणी केली .

हेही वाचा… नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत बाहेर फिरण्यावर निर्बंध; नव्या प्रणालीद्वारे हालचालींवर लक्ष; आजपासून अमलबजावणी

हेही वाचा… मनमाड : गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करण्याचा रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून १३ मे रोजी रात्री नऊ वाजता दुसऱ्या धर्माच्या एका गटाची मिरवणूक होती. मंदिरात जाऊन देवाला धुप दाखवू द्या, अशी मागणी त्या गटातील काही युवकांनी केली. मात्र मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी त्यास आक्षेप घेतला. यावरून वाद सुरू झाला. या प्रकाराला ब्राह्मण महासंघासह अन्य हिंदु संघटनांनी विरोध दर्शवला. या बाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली.