लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीबाबत प्रथम अपिलात पारित केलेल्या आदेशात स्वहस्ताक्षरात बनावट माहिती समाविष्ट केल्या प्रकरणी एका महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाने आदेश दिले.

Mumbai, Mumbai dabbawala, Removal of dabbawalla Statue, Removal of dabbawalla Statue at Haji Ali, Potential Removal of dabbawalla Statue, Mumbai dabbawala, haji ali, haji ali chowk, haji ali chowk dabbawal chowk, mangalprabhat lodha, marathi news, dabbawala news, marathi news,
डबेवाल्यांचा पुतळा अन्यत्र हलविण्याचा घाट, संघटनेचा आरोप; देखभालीसाठी नवी कंपनी
Delhi Bomb Threat
दिल्लीतील १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी; केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान

खंडपीठाचे कक्ष अधिकारी चंद्रकांत कातकाडे यांनी तक्रार दिली होती. सुनिता ठाकरे (खामगाव, पाचोराबारी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. खामगाव येथील संशयित महिलेने शहादा पंचायत समितीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. वेळेत माहिती उपलब्ध न झाल्याने तिने प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलाच्या सुनावणीस महिला अनुपस्थित राहिल्याने परस्पर निकाल देण्यात आला. यामुळे महिलेने राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे धाव घेत अपील दाखल केले.

हेही वाचा… चहामधून गुंगीचे औषध पाजून चोरी, कुरियर कर्मचाऱ्याकडील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

प्रथम अपिलामध्ये पारित केलेल्या आदेशात महिलेने खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे. १५ दिवसांत माहिती टपालाने देण्यात यावी, असे स्वहस्ताक्षरात बनावट माहिती नमुद केली. पडताळणीत ही बाब निदर्शनास आल्याने बनावट आदेशाच्या प्रती आयोगास सादर करून दिशाभूल व फसवणूक करण्याचा तिने प्रयत्न केल्याने खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.