नाशिक: शेतकऱ्यांना आपला पिकवलेला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी अंदरसुल येथील कृषी उत्पन्न उपबाजारात मका व भुसार मालाच्या लिलावास सुरुवात करण्यात झाली. यावेळी भुजबळ यांनी स्वतः शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष वसंत पवार, ॲड. बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : महाथकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वादन ; थकबाकी वसुलीचा श्रीगणेशा

हेही वाचा >>> नाशिक: दुचाकी चोरांना अटक; नऊ मोटारसायकली हस्तगत

यावेळी भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले असल्याने त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे, याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. त्यापैकी अद्यापही अनेक कामांची स्थगिती कायम आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहेत. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decentralization of markets is necessary for the farmers chhagan bhujbal expectation ysh
First published on: 18-10-2022 at 16:15 IST