केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करणे, मतदारांना मतदान केंद्राची माहिती असलेली चिठ्ठी वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहे. भाजपशी संबंधित मतदारांची काळजी घेणे किंवा त्यांचे मतदान वाढावे या दृष्टीने हे सारे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

‘लोढा फाऊंडेशन’ संलग्न ‘हिंदू रोजगार डॉट कॉम’ आणि भाजप शुभचिंतकांनी दक्षिण मुंबईसह शहरातील काही भागात ‘मोदी मित्र’ नियुक्त करून मतदारांची माहिती जमा करणारा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात निवडणूक प्रचारासाठी हा कार्यक्रम सुरू केला. पण हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
prakash ambedkar in satara district for election campaign
सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर; डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट

हेही वाचा – “विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका

दक्षिण मुंबईसह शहरातील अन्य भागात लोढा फाऊंडेशन आणि हिंदू रोजगार डॉट कॉमसह काही संस्था व संघटना भाजपला निवडणूक प्रचार कार्यात मदत करीत आहेत. हिंदू नोकरी डॉट कॉम या संस्थेने घरोघरी जाऊन मतदारांची माहिती जमा करणे व जनसंपर्कासाठी ‘मोदी मित्र’ नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत कुटुंबांची नोंदणी सुरू केली आहे. त्यात मतदार कोणत्या विभागात राहतो, कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील अन्य सदस्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक व अन्य माहितीची नोंद एका स्लीपद्वारे सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या घरी भेट दिल्यावर त्यांचा प्रतिसाद कसा होता, कोणता अनुभव आला, यासह अन्य तपशील मोदी मित्रांनी आपल्या अहवालात नोंदवायचे आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनसंपर्कासाठी मोदी मित्रांना प्रचार साहित्य व अन्य साहित्याचे वाटप केले जात आहे. मतदाराचे निवडणूक केंद्र कुठे आहे, त्याबाबत स्लीप देण्यात आली आहे का, त्याचा निवडणूक ओळखपत्र क्रमांक, मतदाराला मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्याची कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, याचाही तपशील मोदी मित्रांकडून नोंदविला जात आहे. मोदी मित्रांची मंगलप्रभात लोढा यांच्याशी भेटही घडविण्यात येणार आहे, त्याबाबतही अहवाल नमुन्यामध्ये नोंद आहे. भाजपला अनुकूल किंवा मतदान करू शकतील, अशा मतदारांचा अंदाज या सर्वेक्षणातून बांधण्यात येणार आहे आणि त्यांनी मतदानासाठी यावे, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

हेही वाचा – गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप

लोढा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रचार प्रमुख असून त्यांच्या मदतीसाठी कार्यरत संस्थांनी मोदी मित्रांद्वारे घरोघरी जाऊन मतदार जनसंपर्काचा उपक्रम सुरू केला आहे. यासंदर्भात प्रदेश पदाधिकाऱ्यांना विचारता त्यांनी हा पक्षाचा उपक्रम किंवा निवडणूक कार्यक्रम नसल्याचे नमूद केले. एखाद्या नेत्याने, पदाधिकाऱ्याने स्वत:च्या पातळीवर हा उपक्रम सुरू केला असेल. भाजपने निवडणूक केंद्र (बूथ) निहाय किमान दहा कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. प्रत्येकाने आणखी कार्यकर्ते तयार करून व्यापक जनसंपर्काची भाजपची मोहीम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.