नाशिक – देवळालीत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या प्रचाराने महायुतीतील बिघाडी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांच्या नांदगावमधील बंडखोरीला शिंदे गटाने देवळाली व दिंडोरीत अधिकृत उमेदवारीने प्रत्युत्तर दिले होते. दिंडोरीत माघार घेतली गेली. परंतु, देवळालीतील उमेदवारी तांत्रिक मुद्यावर कायम राहिली. आता पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रचाराला लागल्याने संभ्रमात भर पडली असताना शिंदे गटाचे पदाधिकारी मूग गिळून आहेत.

जागा वाटपावरून महायुतीत बरीच रस्सीखेच होऊनही शिंदे गटाला जिल्ह्यात केवळ दोन जागा मिळाल्या. इतर मतदारसंघात मित्रपक्षांचे आमदार असल्याने त्या जागा संबंधित पक्षांकडे जाणे स्वाभाविक होते. नांदगावमध्ये छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी पक्षीय पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली. शिंदे गटाच्या जागेत झालेली ही बंडखोरी रोखण्यासाठी दोन मतदारसंघात अधिकृत उमेदवार देऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. नांदगावमधून समीर भुजबळ यांनी माघार घेतली नाही. उलट दिंडोरी आणि देवळालीतून माघार घेण्याची तयारी शिंदे गटाला करावी लागली. या घटनाक्रमात दिंडोरीतून माघार झाली असली तरी देवळालीत माघार न झाल्याने शिंदे गटाची कोंडी झाली.

हेही वाचा – मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

u

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये प्रचार सभा झाली. त्यात सर्व मतदारसंघांतील उमेदवारांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले होते. तिथे देवळालीतील अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांना व्यासपीठावर स्थान मिळाले. शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव अनुपस्थित होत्या. सरोज अहिरे यांची पंतप्रधानांच्या सभेतील उपस्थिती त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्यावर शिक्कामोर्तब करणारी असल्याचा दावा विधानसभा संघटक सोमनाथ बोराडे यांनी केला.

हेही वाचा – पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवळालीतील उमेदवारीबाबत मंथन करणारे शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी सध्या मौन बाळगून आहे. दुसरीकडे अहिरराव यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रचाराला वेग दिला आहे. त्यांच्याबरोबर स्थानिक पातळीवरील शिवसैनिक प्रचार करीत असल्याने महायुतीत गोंधळाची स्थिती आहे.