धुळे : भाजीपाला वाहून नेणारी मालमोटार दुचाकीवर उलटल्याने दबून सोनगीर ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दंत वैद्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. आदिती जोगळेकर-सोनवणे (३५) दुचाकीने धुळ्याहून सोनगीरच्या दिशेने जात असताना महामार्गावरील सरवड फाट्याजवळ मागून येणारी भाजीपाला घेऊन निघालेली मालमोटार आदिती यांच्या दुचाकीवर उलटली. या अपघातात त्या दाबल्या गेल्याने जखमी झाल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : देशात संविधानाची तोडफोड, चंद्रकांत हांडोरे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर मालमोटार चालक फरार झाला. मुंबई येथून डॉ. आदिती या धुळे तालुक्यातील सोनगीर ग्रामीण रुग्णालयात बदली होऊन आल्या होत्या. डॉ. आदिती एक उत्तम डेंटिस्ट म्हणून प्रसिद्ध होत्या. सर्वांशी प्रेमाने बोलणे, आस्थेवाईकपणे चौकशी करणे, असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोनगीरच्या ग्रामस्थांनी दु:ख व्यक्त केले. डॉ. आदिती यांचे पती डॉ. मनोज सोनवणे हे देखील डेंटिस्ट आहेत. पाच वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. धुळ्यातील जी.टी.पी. चौकाजवळ ते वास्तव्यास आहेत. दोघांना पाच वर्षांची मुलगी आहे.