शिवशाहीसाठी नाशिक- मुंबई प्रवासाला ४०० तर पुण्याला ४६५ रुपये तिकीट; सर्वसाधारण बसला नाशिक-अहमदनगर २५५, धुळ्यासाठी २३५ रुपये

नाशिक : इंधन दरवाढ आणि गाड्यांच्या सुट्या भागांचे दर वाढल्याने राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी उंबरठ्यावर महामंडळाने भाडेवाढ केली. साधारणत ४० ते ६५ रुपयांची भाडेवाढ झाली आहे. महामंडळाच्या सर्वच प्रकारच्या गाड्यांमध्ये १७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून नाशिक ते पुणे निमआराम विनावाहक सेवा व शिवशाही सेवेकरीता ठोक भाडे आकारण्यात येणार आहे.

महामंडळाच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात होती. सोमवारी मध्यरात्रीपासून सुधारीत भाडेवाढ लागू झाली. पाच ते बारा वर्षांच्या मुलांना ग्रामीण बसेस मध्ये असलेले अर्धे प्रवासभाडे पूर्वी प्रमाणे ठेवण्यात आले आहे. तसेच सवलत असलेल्या घटकांच्या सवलतीही कायम राहणार आहे. साधी, जलद, रातराणी, निमआराम, विना वातानुकूलित, शिवशाही, वातानुकूलित शिवनेरी या बसच्या प्रवासी भाड्यात वाढ झाली. नव्या निर्णयानुसार, सर्वसाधारण जलद बससाठी नाशिकहून मुंबईसाठी २७० रुपये, पुण्यासाठी ३१५, औरंगाबादसाठी २९५, बोरिवली २७०, अहमदनगर २५५, धुळ्यासाठी २३५, जळगावकरता ३७५, चोपडासाठी ३५०, नंदुरबारला ३२५ रुपये मोजावे लागणार आहेत. निमआरामसाठी नाशिकहून मुंबईसाठी ३७०, पुण्यासाठी ४३०, औरंगाबादसाठी ४०५, बोरिवली ३७०, अहमदनगर ३४५, धुळे ३२०, जळगाव ५१०, चोपडा ४७५, नंदुरबारसाठी ४४० रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

रातराणी मध्ये मुंबई करता ३१५, पुणे ३५५, औरंगाबादसाठी ३४५, बोरिवली २६०, अहमदनगर ३००, धुळे २८५, जळगाव ४२५, चोपडा करता ४०० आणि नंदुरबार करता ३७० तसेच शिवशाहीसाठी नाशिकहून मुंबईसाठी ४००, पुणे ४६५, औरंगाबाद ४४०, बोरिवली ४००, अहमदनगर ३७५, धुळे ३५०, जळगावसाठी ५५५, चोपड्यासाठी ५२०, नंदुरबारला जाण्यासाठी ४८० रुपये मोजावे लागणार आहेत.