नाशिक – बनावट कागदपत्रांच्या आधारे ३५० कोटींहून अधिकची कर्ज मिळवून नंतर ही रक्कम स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासह मालमत्ता खरेदीसाठी वळवून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने मेसर्स केजीएस शुगर ॲण्ड इन्फ्रा कंपनी संचालकांच्या नाशिक, कोपरगाव व ठाणे येथील व्यावसायिक व निवासी ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत ७०.३९ लाखाच्या रोकडसह सुमारे दीड कोटींचे सोन्याचे दागिने, महागडी मोटार व शेअर्स जप्त करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते प्रल्हाद पाटील कराड यांच्या पुढाकारातून केजीएस शुगर्स ॲण्ड इफ्रा कंपनीची स्थापना झालेली आहे. संचालक मंडळात अधिक्याने त्यांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याचे दिसून नेते. कराड पाटील हे अवसायनात निघालेल्या निफाड सहकारी कारखान्याचे संचालक होते. निसाका बंद पडल्यानंतर संबंधितांनी ही कंपनी स्थापन केली. कंपनीचे संचालक दिनकर बोडके व इतरांविरुद्ध जालना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे इडीने तपास सुरू केला. त्यात केजीएस शुगरने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून फसवणुकीने सुमारे ३५० कोटी रुपयांचे बँक कर्ज मिळवले. नंतर संशयितांनी विविध संस्थांच्या माध्यमातून तो निधी पळवला. वेगवेगळ्या व्यावसायिक व्यवहारांच्या नावाखाली अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) सक्तवसुली संचनालयाच्या मुंबई विभागाने कंपनीशी संबंधित संचालकांच्याां नाशिक, कोपरगाव, ठाणे येथील व्यावसायिक आस्थापना व निवासस्थानांवर छापे टाकले. त्या अंतर्गत ७०.३९ लाख रुपयांची रोकड, एक कोटी ३६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, अलिशान मोटार, १० लाखाचे शेअर्स जप्त करण्यात आले. या शिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेनामी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, इतर दस्तावेज हस्तगत करण्यात आले.