scorecardresearch

Premium

धावत्या वाहनातील प्राणवायू सिलिंडरच्या स्फोटाने नाशिकच्या काही भागात हादरा; इमारती, वाहनांच्या काचा फुटल्या

स्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या चारचाकी व रिक्षाचेही नुकसान झाले. या दुर्घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले.

explosion of oxygen cylinder in a moving vehicle in nashik
प्राणवायू सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचे झालेले नुकसान

नाशिक – रुग्णालया्ंना प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या वाहनातील (टेम्पो) एका सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे शनिवारी सायंकाळी गंगापूर रोडसह आसपासचा परिसर हादरला. हा स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यालगतच्या चार ते पाच इमारतींची तावदाने फुटली. वाहनाचे पूर्णत: नुकसान झाले. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या चारचाकी व रिक्षाचेही नुकसान झाले. या दुर्घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा >>> नाशिक : ललित पाटीलसह चौघांना पोलीस कोठडी

Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
yavatmal theft marathi news, jewellery of rupees 30 lakhs stolen yavatmal marathi news, raymond company s housing colony yavatmal
‘रेमंड’मधील अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चक्क ३० लाखांचे दागीने लंपास; सुरक्षा भेदून चोरी
Where are the sidewalks for walking High Court question on action against illegal hawkers
चालायला पदपथ आहेतच कुठे? बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईवरून उच्च न्यायालयाचा प्रश्न
Two injured during demolition mumbai
बोरिवली येथे इमारतीच्या पाडकामादरम्यान दोन जखमी, राडारोडा चालत्या रिक्षावर पडला

गंगापूर रस्त्यावरील शांतीनिकेतन चौक परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खासगी रुग्णालयांना प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा करणारे वाहन या भागातून निघाले होते. गतिरोधकावरून जाताना त्यातील काही सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने गंगापूर रोड परिसरातील इमारती व घरांना हादरे बसले. ज्या चौकात हा स्फोट झाला, त्या परिसरातील शैलजा अपार्टमेंट, ऋषिराज हॉरिझॉन (एक व दोन) आणि अन्य इमारतींच्या काचा फुटल्या. प्रचंड आवाजाने नागरिक भयभीत झाले. स्फोटाने सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चक्काचूर झाला. सिलिंडर काही अंतरावर फेकले गेले होते. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. गंगापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांना दूर करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. वाहनातील तीनपैकी एका सिलिंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान,वाहन गतिरोधकावर आदळून सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explosion of oxygen cylinder in a moving vehicle in nashik zws

First published on: 09-12-2023 at 21:24 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×