धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ असलेल्या धनराज काचवाले दुकानाच्या गोदामाला सोमवारी सकाळी आग लागली. महापालिका अग्निशमन विभाग आणि टोल प्लाझाच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला केंद्राची मान्यता

हेही वाचा – नाशिक : पुणे विद्यापीठ उपकेंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी द्या, सागर वैद्य यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच महापालिका अग्निशमन विभाग आणि महामार्गावर असलेल्या टोल प्लाझा येथील अग्निशमन दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच सोमा टोल प्लाझाचे कर्मचारी दीपक वाघ, सोमनाथ गवळी, योगेश भोई, प्रवीण मानके, मुस्कान खान आणि महापालिका अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बंबातील पाण्याच्या जोरदार फवाऱ्यानंतर धूर आणि आगीचे लोळ कमी झाले. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती नगरसेवक राजेश पवार यांनी दिली. मोहाडी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

More Stories onधुळेDhule
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at shop godown in dhule ssb
First published on: 06-02-2023 at 13:20 IST