नाशिक : गणेशोत्सवानिमित्ताने शहरातील पंचवटी कारंजा परिसरात आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतअसल्याने शनिवारपासून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मालेगाव स्टॅण्ड परिसरात मंगळवारपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

गणेशोत्सवातील सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड परिसरात गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शनिवारपासून १७ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी पाच ते रात्री १२ या वेळेत परिसरातील काही मार्ग हे वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा…कांदा दरात ४०० रुपयांनी वाढ, क्विंटलचे दर ४६०० रुपयांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिंडोरी नाकाकडून मालेगांव स्टॅण्ड हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मखमलाबाद नाका ते मालेगांव स्टॅण्ड मार्गावरील वाहतूकही दोन्ही बाजूंकडून बंद करण्यात आली आहे. दिंडोरी नाक्याकडून मालेगांव स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहनांनी पेठ नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी-चोपडा लॉन्समार्गे इतरत्र या पर्यायी मार्गाचा वापर करावा. मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहनांनी ही पेठ नाकामार्गे इतरत्र या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.