scorecardresearch

धुळे : खडसेंच्या कानगोष्टींची ध्वनिफित उपलब्ध – गिरीश महाजन यांचा दावा

सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्याआधी खडसे यांनी त्यांना मंत्रिपद मिळेल का, याची चिंता करावी.

धुळे : खडसेंच्या कानगोष्टींची ध्वनिफित उपलब्ध – गिरीश महाजन यांचा दावा
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्याशी एकनाथ खडसे यांनी कोणत्या कानगोष्टी केल्या, त्याची ध्वनिफित आणि छायाचित्र उपलब्ध आहे, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.शिरपूर शहर आणि तालुक्यातर्फे सोमवारी दुपारी शिरपूरच्या आर. सी. पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या मैदानावर मंत्री महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. अमरिश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभाआधी महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्ताराला दिवाळीचा मुहूर्त आहे.

हेही वाचा >>> नागपूर : ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच समपुदेशकाची नियुक्ती’

सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्याआधी खडसे यांनी त्यांना मंत्रिपद मिळेल का, याची चिंता करावी. त्यानंतर अशी वक्तव्ये करावीत. खडसेंनी अधिक बोलायला लावू नये, असा इशारा महाजन यांनी दिला. अलिकडे करण्यात आलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती ही तात्पुरती असून त्यामुळे मंत्र्यांना एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते जाणार नसल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या