लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरात कॅनडा कॉर्नर आणि सिडको या भागात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शरणपूर रस्त्यावरील सरला अपार्टमेंट येथे पहिली घटना घडली. याबाबत अनुप पाटील यांनी तक्रार दिली. पाटील कुटुंबीय शनिवारी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड, सोन्याचांदीचे दागिने व देवघरातील देवी-देवतांचे चांदीचे नाणे असा सुमारे ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना सिडकोतील माऊली लॉन्स भागात घडली. या बाबत नेहा बोराडे (अक्षय रो हाऊस, मुरारीनगर) यांनी तक्रार दिली. बोराडे या दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-नाशिक: ग्रामपातळीवर निरक्षरांचा शोध, नवभारत साक्षरता अभियान; सर्वेक्षण पंधरवड्यात पूर्ण करण्याची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सिन्नर पोलीस ठाण्यातंर्गत स्वप्नील भुरट यांच्या बंद घराचे कुलूप तोडत सोने चांदीचे दागिने, अलंकार असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरातील निमगाव येथे पांडुरंग आव्हाड यांच्या भावाचे घर चोरट्यांनी बनावट चावीने खोलले. घरातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड पोलीस ठाण्यातंर्गत अलिम तांबोळी यांच्या टायर सर्व्हिस दुकानात चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत ८०,६०० रुपयांचे ५२ टायर लंपास केले.