धुळे : महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपल्याने आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची नगर विकास विभागाने धुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रशासक पदावर अमिता दगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेवर आता प्रशासकराज सुरू झाले आहे.

हेही वाचा… नाशिक जिल्ह्यातील अंकाई किल्ल्याजवळील भुयाराचे गूढ, पुरातत्व विभागाकडून पाहणी होणार

हेही वाचा… द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक झालेली नाही. अशा अनेक ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. धुळे जिल्हयातील शिरपूर, दोंडाईचा आणि साक्री नगरपालिकेवरही प्रशासक राजवट सुरू आहे.या तिन्ही पालिका भाजपच्या ताब्यात होत्या. आता धुळे महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले असून, महापालिकेत देखील भाजपची एकहाती सत्ता होती. प्रशासक राजवटीची धुळे महापालिकेच्या इतिहासात ही तिसरी वेळ असून यापूर्वी १९८५ मध्ये प्रशासकपदी विश्वासराव पाटील यांची तर २००३ मध्ये दिलीप बंड यांची नियुक्ती प्रशासक पदावर झाली होती. धुळे महापालिकेवर दोनवेळा प्रशासकांनी कामकाज सांभाळले आहे. अमिता दगडे-पाटील या धुळे महापालिकेच्या इतिहासात तिसऱ्या प्रशासक ठरल्या आहेत. प्रशासकांसमोर शहरातील काही भागात होणारा अनियमित पाणी पुरवठा, कचरा या प्रमुख समस्या कशा दूर कराव्यात, हे आव्हान राहणार आहे.