जळगाव: घराचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची लाच स्वीकारताना शहरातील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

संतोष प्रजापती (३२) असे लाचखोर वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. तो महावितरणच्या आदर्शनगर कक्षात कार्यरत होता. शहरातील एका भागातील तक्रारदारांच्या आईच्या नावाने घरात महावितरण कंपनीचे मीटर आहे. त्यांचे मीटर जुने व नादुरुस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ प्रजापतीने २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा… धुळ्यात गुन्हेगारास बंदुकीसह अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याअनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी लाच पडताळणीसाठी पथक नियुक्त केले. पथकाने सापळा रचत प्रजापती याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.