धुळे : इच्छुकांच्या भाऊगर्दीत भाजपने पुन्हा विश्वास ठेवलेले धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात मालेगावमध्ये फलकबाजी करण्यात आली आहे. या फलकांव्दारे खासदारकीला न्याय देणारा उमेदवार धुळे- मालेगाव लोकसभेला हवा, असा खासदार मान्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

धुळे-मालेगाव मतदार संघाचा उमेदवार आम्हाला बदलून हवा, अशा आशयाचा फलक मालेगाव शहरात लावण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. या फलकातून थेट भामरे यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून विद्यमान खासदार हरवले आहेत, विद्यमान खासदार यांचे धुळे लोकसभा मतदार संघात हिंदुत्वासाठी योगदान काय ? शारीरिक क्षमता नसलेला खासदार आम्हाला नको, असा मजकूरही फलकावर आहे.

vanchit, Amol Kolhe, court,
अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
Lal bihari Mritak and PM Modi
जिवंत असून लाल बिहारींना करण्यात आलं होतं मृत घोषित, आता नरेंद्र मोदींविरोधात लढणार निवडणूक
Chief Minister Eknath Shinde will not allow injustice to be done to Bhavna Gawli says Neelam Gorhe
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही : नीलम गोऱ्हे

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात ४८०० मतदान केंद्रांवर किती मनुष्यबळ लागणार ?

हा फलक गुरुवारी सायंकाळी मालेगाव शहरात लावण्यात आला. यामागील कर्ताकरविता ‘धनी’ कोण, हे उघड झालेले नाही. या अनपेक्षित कृत्यामुळे भामरे यांना निवडणुकीत विरोधकांसह स्वकियांनाही तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. भाजप निरीक्षकांच्या धुळे दौऱ्यात, आपणास कोणता उमेदवार चालेल, हे मतदार संघातील पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात येत असल्याचे आणि उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होणार नाही, हे निरीक्षकांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा…केबीसी घोटाळ्यातील सूत्रधारांची ८४ कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने का जप्त केली ?

परंतु, या बैठकीसाठी मोजक्या आणि एकालाच पसंती देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते, असे काहींचे म्हणणे होते. पक्ष निरीक्षकांसमोर इच्छुकांपैकी निवृत्त सनदी अधिकारी प्रतापराव दिघावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन दहिते, डॉ.विलास बच्छाव, डॉ. माधुरी बोरसे हे उपस्थित होते. पैकी काहींनी शक्ती प्रदर्शनही केले होते. मतदार संघात निवडणूकपूर्व सक्रिय झालेल्या या इच्छुकांनी आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न केले. पण या स्पर्धेत पुन्हा एकदा भामरे यांनीच बाजी मारली. इथूनच खरी डॉ. भामरे यांना विरोधाची धार अधिक तीक्ष्ण झाल्याचे म्हटले जाते. भामरेंविरोधातील विरोध उघडपणे फलकाव्दारे व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.