मनमाड: शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची बनावट मुदत ठेव व इतरही मार्गाने कोट्यवधींची फसवणूक झाली. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे. या सर्व प्रकारास युनियन बँक प्रशासन दोषी असून त्यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांकडे दिली. त्यावरून विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याच्यासह युनियन बँकेचे सात अधिकारी व कर्मचारी याच्याविरुध्द मनमाड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझाद रस्त्यावरील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत बसून अधिकारी असल्याचे भासवून आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शंभरावर ग्राहकांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक शेतकरी, नोकरदार, निवृत्तीवेतनधारक व व्यापारी आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बॅंक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या केल्या. बँक व्यवस्थापकाने याविषयी विमा कंपनीचा प्रतिनिधी असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केल्याची ग्राहकांची भावना आहे. या संदर्भात संबंधितांनी आमदार कांदे यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. पीडित ग्राहकांसमवेतच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार कांदे यांनी मनमाड पोलीस ठाण्यात निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे तक्रार दाखल केली. कांदे यांच्यासह ६९ तक्रारदारांची यावर स्वाक्षरी आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Four died, house,
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू

या प्रकरणात विमा प्रतिनिधी सुधीर देशमुख यासह युनियन बँक प्रशासनाला दोषी मानावे. याची जबाबदारी ही बँक प्रशासनाची आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून देशमुखसह युनियन बँकेचे उमेष भांगे, स्वप्नील गवळी, संकेत गवई, अशोक सरोज, प्रभातकुमार, अमरनाथ गुप्ता व कृष्णा प्रसाद या बँकेतील सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहन कांदे यांनी केले आहे. आठ दिवसांत यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नाशिक येथील युनियन बँकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा कांदे यांनी दिला.