नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात डॉ. गोऱ्हे यांनी शुक्रवारी कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा उपायुक्त करिष्मा नायर, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. गोऱ्हे यांनी, कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने महिला आणि बालके भाविक म्हणून येत असल्याने त्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय असल्याचे सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात याबाबींचा समावेश होणे आवश्यक आहे. महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, वस्त्रांतरगृहे, हिरकणी कक्ष आदींचा समावेश आराखड्यात असावा. कुंभमेळ्यात ठिकठिकाणी स्वच्छता, नदी परिसर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, भाविकांचे आरोग्य, आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आदींबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.