नाशिक : मॅफेड्रोन अमली पदार्थ विक्री प्रकरणी शहरातून तीन महिलांसह चौघांना ताब्यात घेत अमली पदार्थ विरोधी पथकाने ६ लाख १३ हजार ३२० रुपयांचा माल जप्त केला. संशयितांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकातील अंमलदार अविनाश फुलपगारे यांना गणेश गिते (४५, रा. मखमलाबाद), स्वीटी अहिरे (२८, रा. पेठरोड), ऋतुजा झिंगाडे (२२, रा.शिवाजी नगर), पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (रा. अमृतधाम, पंचवटी) हे अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा शहर प्रभारी अधिकारी सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी शिताफीने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख, १५ हजार ५०० रुपयांचे ७८.५ ग्रॅमचे मॅफेड्रोन जप्त करण्यात आले. या कामगिरीसाठी मॅक्स या श्वानाची मदत झाली. अमली पदार्थ आणि इतर साहित्य असा सहा लाखापेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पल्लवीविरुध्द याआधी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.