नाशिक : पाळीव कुत्रे नोंदणीसाठीच्या शुल्कात वाढ झाली असून प्रथम नोंदणीच्या वेळी ३५० रुपये भरावे लागतील आणि दरवर्षी नुतनीकरणासाठी नंतर २५० रुपये लागणार आहेत. या नोंदणीसाठी कुत्र्याचे लसीकरण बंधनकारक आहे. सध्या शहरात २०४० नोंदणीकृत कुत्रे असून शुल्क वाढीमुळे ही संख्या वाढेल की कमी होईल, हा प्रश्न आहे.

हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

हेही वाचा : विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

महानगरपालिका स्थायी समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या पाळीव कुत्रे नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. पाळीव कुत्रे नोंदणीसाठी कुत्रे कर ५० रुपये, कुत्रे बिल्ला २५ आणि कुत्रे अनुज्ञापत्रापोटी २५ असे एकूण १०० रुपये शुल्क होते. करात पाचपट वाढ करण्यात आली. कुत्रे करापोटी २५० रुपये, बिल्ला ५० आणि अनुज्ञापत्रापोटी ५० असे एकूण ३५० रुपये लागणार आहेत.

हेही वाचा : लष्करी अभियंत्यांना एक लाख १६ हजारांची लाच स्वीकारताना अटक

पाळीव कुत्र्यांच्या प्रथम नोंदणीसाठी ३५० रुपये आणि नंतर नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी २५० रुपये शुल्क लागणार आहे. शुल्क वाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने कुत्रे पालनाचा खर्च वाढला आहे. सद्यस्थितीत शहरात दोन हजार ४० नोंदणीकृत कुत्रे असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. पाळीव कुत्र्यांसह कत्तलखान्यातील जनावरांच्या कत्तल शुल्कातही वाढ झाली आहे.

हेही वाचा : अखेर खडसेंचे ठिय्या आंदोलन स्थगित ; पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४४१ सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

महानगरपालिकेच्या विविध विभागात जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडील ४४१ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यातील ३०० सुरक्षारक्षकांंचा एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२२ आणि ९० महिला, ४१ पुरूष सुरक्षारक्षकांना मे २०२१ ते डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी १७ कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर झाला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या शासकीय कंत्राटांना १२ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के वस्तू व सेवा कर द्यावा लागणार आहे.