लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन्ही परिमंडळातील १३ पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हेगार तपासणी, ऑलआऊट अशा मोहिमा राबविणे सुरु केले आहे.

Resident doctors, attacked,
दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र
mumbai municipal corporation seizes six motor garages for non payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटार गॅरेजवर जप्तीच मालमत्ता करवसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
pimpri police constable suspended marathi news,
पिंपरी : आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

काही महिन्यांपासून नाशिकचे नाव गुन्हेगारी विश्वात गाजत आहे. खून, सोनसाखळी चोरी, टोळी युध्दाचा भडका, वाहनांची तोडफोड अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजकंटक दहशत माजवत असताना अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण उघड झाले. ललित पाटीलमुळे नाशिकचे नावही पुढे आले. या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या जागी आलेले कर्णिक यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच शहरात कायदा सुव्यवस्था राहील, नाशिककर रस्त्यावर निर्भिडपणे फिरू शकतील, असे आश्वासन दिले होते. कर्णिक यांना कारभार हाती घेऊन आठ दिवसही होत नाही तोच, म्हसरूळ परिसरात वाहनधारकांची लूट करणाऱ्यांना अटकाव करणाऱ्या सैन्यातील माजी जवानाचा खून करण्यात आला. यामुळे कर्णिक यांना त्यांच्यासमोर किती मोठे आव्हान आहे, याची कल्पना आल्याने त्यांनी शहरातील सराईत गुन्हेगार तसेच टवाळखोर, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. परिमंडळ एक आणि दोनमधील सर्व १३ पोलीस ठाण्यातंर्गत पोलिसांनी तपासणी, ऑल आऊट यासारख्या मोहिमा राबवत गुन्हेगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

आणखी वाचा-सिन्नरमधून तीन बाल कामगारांची सुटका

परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापूर या पोलीस ठाणे हद्दीतील ३१७ टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत २४८ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले. कोटपा कायद्यातंर्गत पाच जणांवर कारवाई करण्यात आली.

शहर पोलिसांकडून संशयितांची छायाचित्रे प्रसारित

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड, भद्रकाली, उपनगरसह सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईत जेरबंद केलेल्या संशयितांची छायाचित्रे असलेली माहिती नाशिक पोलिसांकडून समाज माध्यमातून देण्यात येत आहे. शहर पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत होत असून त्यामुळे टवाळखोर, समाजकंटकांवर दहशत बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.