जळगाव – नंदुरबारहून जळगावला आलेल्या दोन मित्रांना धावत्या रेल्वेने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ओम वाघेला (२३, रा.अहमदाबाद) असे अपघातातील मृताचे नाव आहे. समर्थ रघुवंशी (२२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मित्र जळगावला येत असताना सुरतहून येणारी रेल्वे काही वेळ स्थानकाच्या अलीकडे थांबली. त्यामुळे ओम आणि समर्थ यांनी रेल्वेतून उतरून पायी चालत रेल्वे स्थानक गाठण्याचा निर्णय घेतला. ते चालू लागले असताना जळगावकडून जाणाऱ्या तुलसी एक्स्प्रेसची त्यांना धडक बसली. दोन्ही मित्र रेल्वे रुळालगत फेकले गेले. त्यात ओमचा जागीच मृत्यू झाला तर समर्थ गंभीर जखमी झाला.

हेही वाचा – परीक्षा केंद्रातच महिलेस प्रसुती वेदना अन पोलिसांची तत्परता

हेही वाचा – पतंगीच्या नायलाॅन मांजामुळे वृध्दाच्या गळ्यास जखम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओम आणि समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांबरोबर ते नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. जळगाव रेल्वे स्थानकात ओम आणि समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते.