नाशिक – शहराजवळील पळसे परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. .पळसे शिवारात बंगाली बाबा, गायखे मळा, गाववस्ती परिसरात मळे या भागात बिबट्याचा वावर असल्याची तक्रार परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. पोलीस पाटील सुनील गायधनी, सरपंच दिलीप गायधनी यांनी याबाबत वन विभागाकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा >>> नाशिक : ओझरमधील युवक खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरात बिबट्याने पशुधनावर हल्ला करुन दोन वासरांना जखमी केल्यावर ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. वनविभागाच्या पथकाने परिसरात पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी बकरीला ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वन अधिकारी विवेक भदाणे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या बिबट्या असलेला पिंजरा दुसरीकडे नेला. बिबट्या दोन वर्षाचा असून नर आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.