नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल ते तीन मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दोन्ही मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक कालावधी मिळणार आहे.

जिल्ह्यात ४७ लाख ८६ हजार ९०३ मतदार आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघात ३८३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील नाशिक लोकसभा मतदारसंघातील १९ तर दिंडोरीतील तीन मतदार केंद्र संवेदनशील असून तिथे यंत्रणेकडून अधिक लक्ष दिले जाणार आहे. गैर प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघात सुमारे १८० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Elections in eight constituencies today in the second phase in the maharashtra state
आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…
Yavatmal Lok Sabha seat, mahayuti, lok sabha 2024, maha vikas aghadi, Candidate, Lack of Local, Performance Record, wrath of citizens, yavatmal politics news, washim politics news, washim news,
लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

हेही वाचा…आमदार आमश्या पाडवी यांची पाऊले शिंदे गटाकडे? ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का

या बाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खास संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात २४ लाख ९३ हजार १५५ पुरूष, २२ लाख ९३ हजार ६३८ स्त्री आणि ११० तृतीयपंथी मतदार आहेत.

सैनिक मतदारांची संख्या ८१८८ इतकी आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून राजकीय पक्ष आणि शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. आचार संहितेचे उल्लंघन आणि मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ४५ भरारी पथके, ९० स्थिर पथके आणि ४५ कॅमेरा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा…आरोग्य विद्यापीठाचा एनसीएसएमशी सामंजस्य करार, वस्तू संग्रहालयाची उभारणी

मतदारांना आपल्या भागात कुठे गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास ते सी व्हिजिल ॲपवर छायाचित्र व चित्रफित टाकून तक्रार नोंदवू शकतात. त्याची यंत्रणेकडून तातडीने दखल घेतली जाईल, असे शर्मा यांनी नमूद केली. निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती केली असून सुक्ष्म निरीक्षक या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. जिल्हा ८५ वर्षावरील ६४ हजार ७५७ ज्येष्ठ मतदार आहेत तर २३ हजार ४३४ अपंग मतदार आहे. या दोन्ही घटकांना घरबसल्या मतदान करता येईल. केवळ त्यासाठी संबंधितांना आधी एक अर्ज भरून सादर करावा लागेल, असे शर्मा यांनी नमूद केले.

हेही वाचा…नाशिक : कांदा निर्यात बंदीवरुन विरोधक आक्रमक तर, सत्ताधाऱ्यांना शहरी मतांची चिंता

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे – २६ एप्रिल ते तीन मे
अर्जांची छाननी – चार मे
अर्ज माघारीची मुदत – सहा मे
मतदान – २० मे
मतमोजणी – चार जून