अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक | Loksatta

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक
प्रातिनिधीक छायाचित्र

सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तीन संशयितांनी मिळून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

संशयित सागर भदाणे (वय १९), ज्ञानेश्वर सोमासे, (वय २१), प्रदीप चव्हाण (तिघे राहणार शिवाजी नगर, सातपूर) यांनी या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा रस्ता अडवून तिचे हात व केस पकडून तिचा विनयभंग केला. याबाबत पिडीत मुलीने गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनतर तिघांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांपैकी सागर भदाणे व ज्ञानेश्वर सोमासे यांना अटक करण्यात आली आहे. तर फरार प्रदीप चव्हाण याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-04-2017 at 21:01 IST
Next Story
राज्यातील बंद उद्योगांच्या पुनरूज्जीवनासाठी समिती