scorecardresearch

इगतपुरीत महिलेची हत्या ; सात महिन्यांत तिसरा खून

या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सात महिन्यांतील ही तिसरी खुनाची घटना आहे.

इगतपुरीत महिलेची हत्या ; सात महिन्यांत तिसरा खून
संग्रहित छायाचित्र

नाशिक : इगतपुरी शहरात महिलेची हत्या करण्यात आली आहे. सात महिन्यांतील ही तिसरी घटना असून संशयितांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. गुरुवारी मध्यरात्री गायकवाड नगर येथे संशयित आणि आई यांच्यात झालेला वाद मिटविण्यासाठी जकिया शेख ही विवाहिता गेली होती. जकिया वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना संशयिताने तिचा धारदार शस्त्राने खून केला.

या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सात महिन्यांतील ही तिसरी खुनाची घटना आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली. इगतपुरी स्थानकात मुंबईहून दिल्ली, कोलकाता, हावडा, गोहाटी, अमृतसर, वाराणसी आदी ठिकाणी जा-ये करणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेसला थांबा असल्याने स्थानकात आणि धावत्या रेल्वेत अनेक अनधिकृत विक्रेत्यांकडून व्यवसाय केला जातो. यामुळे स्थानकात गुंडगिरी वाढत चालली आहे.  

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder of a woman in igatpuri third murder in seven months zws

ताज्या बातम्या