नंदुरबार– शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दादा आणि बाबा गणपती  यांचा हरिहर भेट सोहळा मोठ्या दिमाखात झाला. यावेळी  मोठ्या प्रमाणआवर आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. दादा आणि बाबा या दोन गणपतींच्या हरिहर भेटीच्या उत्सवाला शत्तकोतर वर्षांची परंपरा आहे. दोन्ही मानाच्या गणरायांच्या मिरवणुकीला रथावरुन सुरवात होते.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर मानाचा प्रथम गणपती असलेल्या दादा गणपतीची गावभर रथयात्रा फिरून रात्री अकराच्या  सुमारास जळका बाजार परिसरात आला. दुसरा मानाचा गणपती असलेल्या बाबा गणपतीचा रथ देखील या ठिकाणी काही वेळातच  आला. दोन्ही रथ समोरासमोर आल्यानंतर परंपरेप्रमाणे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या गणरायाची आरती केली. आकर्षक आतिशबाजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु राहिली. हा  सोहळा पाहण्यासाठी  जिल्ह्यातून तसेचर गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही गणेशभक्तांनी गर्दी केली होती.