नंदुरबार – जिल्ह्यातल्या सर्वात जूनी नगरपरिषद म्हणून ओळख असलेल्या तळोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून इच्छुकांची वाढलेली संख्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. तळोदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच दिग्गजांची नाव चर्चेत असून नगराध्यक्ष पदासाठीच्या इच्छुकांचा हा चक्रव्युह आ.राजेश पाडवी कसे भेदणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा नगरपरिषदेची स्थापना १८६७ मध्ये झाली. कधी काळी कॉग्रेसचा गड राहिलेल्या या तळोदा नगरपरिषदेवर आता भाजपाची निर्विवाद सत्ता राहिली . या पालिकेवर भरत माळी गटाची एकहाती पकड आहे. नगरसेवकांमधून जेव्हाही नगरअध्यक्ष निवडल्या गेल्या तेव्हा भरत माळी गटाचाच नगराध्यक्ष तळोदा पालीकेवर विराजमान झाला. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष मधून या गटाची हार झाल्याचे पहायला मिळाले.

सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत या नगर परिषदेमध्ये भाजपाचे ११, तर कॉग्रेसचे सहा , शिवसनेचा एक नगरसेवक निवडून आला होता. मात्र लोकनियुक्ती नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत भाजपाच्या अजय परदेशी यांचा विजय झाला होता. मागील वर्षी कॉग्रेसमध्ये असलेला भरत माळी गटही आता भाजपात दाखल झाला आहे. त्यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या वाढली. गत वेळीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी हे देखील यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे.

तर भरत माळी गटातून जितेंद्र सुर्यवंशी यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. भाजपाचे जुने जानते आणि अनेक वेळा प्रदेशस्तरावर विविध पद भुषवलेले डॉ शशिंकात वाणी, मागच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाच्या तिकीट घेवून भरत माळी परिवाराला नगरसेवक पदात पराभुत करणारे योगेश चौधरी आणि त्यांचे बंधु कैलास चौधरी हे देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

भाजपाकडुन तब्बल पाच ते सहा जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने या मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्यासाठी हा डोके दुखाची विषय बनणार आहे. तळोदा नगर परिषद हा आमदाराचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळेच आ. पाडवी या पाच मातबरांपैकी कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे योगेश चौधरी यांचे मामा विजय चौधरी हे प्रदेश महामंत्री असून जिल्हा निवडणूक प्रमुखही आहेत. ते आपल्या राजकिय वजनाचा वापर कसा करता याची उत्सुकता. पदमाकर वळवी हे देखील कॉग्रेसमध्ये परतल्याने आता ते काय रणनिती आखता याबाबत देखील राजकीय कयास बांधल्या जात आहे.

तळोदा नगरपरिषदमध्ये वाढते शिवसेना शिंदे गटाची संख्या हाच भाजपासाठी सर्वाधिक डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजपा त्यांच्या समवेत महायुती करणार कि शिवसेना तळोदा नगर परिषदेमध्ये स्वतंत्र लढणार याबाबत देखील उत्सुकता ताणल्या गेली आहे.