नाशिक : सर्व अनुकूल स्थिती असूनही नाशिकचे अर्थकारण काही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहिले. हवाई नकाशावर आलेल्या नाशिकची माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या देशातील प्रमुख शहरांशी अद्याप थेट जोडणी बाकी आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनधारकांना कित्येक तास कोंडीत अडकून पडावे लागते. नाशिक-पुणे या औद्योगिक शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती रेल्वचा विषय रखडला आहे.

हेही वाचा >>> आरोग्य, शिक्षण सुविधांना गती

Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Voters come out in intense heat for voting but frustrated by slowness
तीव्र उष्म्यात मतदारांचा उत्साह, पण संथपणामुळे हैराण; अनेक केंद्रांवर एक-दीड तास प्रतिक्षा
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
rickshaw along with five motorcycles vandalized on Peth Road in Nashik
नाशिक : पेठरोडवर पाच मोटारसायकलींसह रिक्षाची तोडफोड
five people drown in bhavali dam including four from the same family
नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश
gail ethan cracker project in madhya pradesh
महाराष्ट्रात येणारा ५० हजार कोटींचा उद्योग राज्याबाहेर गेला; विरोधकांकडून टीका
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

नाशिक शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी मांडलेली, देशातील महानगरांपेक्षा वेगळ्या धाटणीची मेट्रो निओची संकल्पना अंतिम मंजुरीअभावी पुढे सरकली नाही. नाशिकच्या अर्थकारणावर कृषी, धार्मिक पर्यटन, उद्योग व्यवसायाचा प्रभाव आहे. वाराणसीतील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदा आरतीला सुरुवात झाली. धार्मिक आणि वाइन पर्यटनाला बराच वाव असताना स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांचा अभाव, दळणवळण व्यवस्थेतील अडचणी प्रकर्षाने समोर येतात. नाशिक जिल्ह्याचे १,५३,१९८ कोटींवर असणारे उत्पन्न प्रशासनाने २०२७-२८ पर्यंत ३,९२,३५१ कोटी रुपयांवर नेण्याचे ध्येय निश्चित केले आहे. एअरबसच्या ताफ्यातील ए-३२० विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारत आहे. कांदा व द्राक्ष निर्यात ग्रामीण अर्थचक्रात महत्त्वाचे ठरतात. शहर, परिसरात वाहतुकीची साधने मर्यादित आहेत.

दळणवळण व्यवस्था महत्त्वाची का?

जिल्ह्यात २२ हजार ८६० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुंबई-नाशिक या चारपदरी महामार्गावरील प्रवास भिवंडीतील वाहतूक कोंडीमुळे जिकिरीचा ठरतो. रखडलेल्या पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पात मार्ग बदलाचा विचार सुरू आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी नाशिक जोडले गेले आहे. प्रस्तावित सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी चार तालुक्यांत भूसंपादनाची तयारी सुरू आहे. नाशिक हे दिल्ली, हैदराबाद, नागपूर, इंदूर, गोवा, अहमदाबाद या शहरांशी थेट विमान सेवेने जोडले गेले आहे. बंगळूरु व अन्य प्रमुख शहरांशी थेट विमान सेवा झाल्यास माहिती तंत्रज्ञानसह अन्य उद्याोगांत गुंतवणूक वाढेल, वाहतूक व्यवस्था व रस्त्यांचे व्यापक जाळे कृषी व उद्याोग क्षेत्राच्या विकासाला हातभार लावणार आहे.