नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस विविध राजकीय घडामोडीं पाहायाल मिळत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजीत तांबेंना ‘या’ दोन शिक्षक संघटनांचा पाठिंबा

सत्यजित तांबे काय म्हणाले? –

सत्यजित तांबे म्हणाले, “माझी सुरुवातच आंदोलनामधून, युवक चळवळीमधून झालेली आहे. प्रसंगी स्वत:च्या सरकारविरोधात, मंत्र्यांविरोधातदेखील मी आंदोलनं केलेली आहे. कारण, मुद्दा महत्त्वाचा आहे प्रश्न महत्त्वाचा आहे. तो सोडवायाचा कसा याचं ज्ञान मागील २२ वर्षांमधील अनुभवातून मला आलेलं आहे. प्रश्न कसे सोडवायचे यामध्ये कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच येणाऱ्या काळात मी काम करेन. याची मी सगळ्यांना ग्वाही देतो.”

आणखी वाचा – सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांचं वक्तव्य; म्हणाले, “माणसं फोडून…”

काय म्हणाले होते कपिल पाटील? –

“नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, या बद्दल शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये होते आहे. त्यासाठी मी चाललो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा कल बघून आम्ही संयुक्तपणे याबद्दलचा निर्णय़ घेऊ. एकमात्र गोष्ट खरी आहे की नागपूर शिक्षक मतदार संघामध्ये आघाडीला वारंवार सांगूनही, आम्हाला पाठिंबा दिलेला नाही. त्या बद्दलाच एक रोष कार्यकर्त्यांमध्ये आहे. दुसऱ्या बाजूल आघाडी कुठेही लढतानाही दिसत नाही. या दोन्ही बाबींचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ.”

याचबरोबर, “सत्यजित तांबे हे जुने मित्र आहेत. ते भेटणार आहेत मला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची भूमिका समजून घेऊ आणि त्यानंतर त्याबद्दल निर्णय़ घेऊ.” असं कपिल पाटील यांनी सांगितलं होतं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik graduate constituency election shiksha bharati sangathanas mla kapil patil support to satyajit tambe msr
First published on: 18-01-2023 at 18:23 IST