नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. या आगीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेत विचारपूस केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, एकनाथ शिंदेंनी दुर्घनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, “या दुर्घटनेत १७ लोकं जखमी झाले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची सुयश रुग्णालयात भेट घेतली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.”

“दुर्घटना मोठी असून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik jindal fire accident five lakh to the deceased high level inquiry say cm eknath shinde ssa
First published on: 01-01-2023 at 19:13 IST