नाशिक – महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक-बोरिवली मार्गावर १२ मीटरच्या ई बस चालविण्यात येत आहेत. तसेच नऊ मीटर ई बस सप्तश्रृंगी गड, नाशिक-कसारा मार्गावर चालविण्यात येत असून अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय, नाशिक- पिंपळगाव मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी ई बस सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा आरंभ बुधवारपासून होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाकडून ई वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत महामंडळाच्या नाशिक विभागात नाशिक, बोरिवली, कसारा, सप्तश्रृंगी गड या मार्गांवर ई बससेवा सुरू आहे. या ताफ्यात नव्याने १२ बस दाखल झाल्या आहेत. या बसची आसन क्षमता ४४ असून ती आरामदायी आहे. सदरची बससेवा वातानुकूलीत आहे. बसमध्ये दिव्यांची विशेष सुविधा आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचीही सुविधा आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत ५० टक्के, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत, अर्जुन -द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थींसाठी १०० टक्के, विद्यमान तसेच माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना १०० टक्के सवलत या बस प्रवासासाठी देण्यात आली आहे.

हेही वाचा – मतदान केंद्रांमुळे शाळांना तीन दिवसांची अघोषित सुट्टी ? शालेय व्यवस्थापनाकडून पर्यायांची चाचपणी

हेही वाचा – नाशिक : आज, उद्या शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीत नाशिक-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या नऊ मीटर ई बस या सप्तश्रृंगी गड, नाशिक- कसारा आणि नाशिक- पिंपळगाव मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नाशिक -सप्तश्रृंगी गड मार्गावर सहा तर नाशिक कसारा मार्गावर दोन अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत. नाशिक पिंपळगाव मार्गावर नव्याने ई बस सेवेच्या आठ फेऱ्या सुरू होत असल्याची माहिती सिया यांनी दिली. फेऱ्यांचा लाभ प्रवाश्यांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.