नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात दोन दिवस गुन्हेगार तपासणी मोहीम राबविण्यात आली. कारवाईत नोंदीतील सराईत तसेच तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : नाशिक मनपातील कथित भूसंपादन घोटाळा ऐरणीवर; महायुती-मविआचे आरोप-प्रत्यारोप

नोंदीतील १४० गुन्हेगारांची तपासणी करण्यात येऊन तडीपार ९४ गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गुन्हेगार अजय लोट उर्फ अज्जुमामा याच्या ताब्यात धारदार शस्त्र सापडले. सातपूर, अंबड, इंदिरानगर तसेच नाशिकरोड परिसरात १३२ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.