नाशिक – नाशिक ग्रामीण पोलीस दलास गुन्ह्यांच्या शोधासाठी अत्याधुनिक अशा न्यायवैद्यक वाहनाचे (फॉरेन्सिक व्हॅन) लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गुन्ह्यांचा तपास परिपूर्ण आणि गतिमान पध्दतीने होण्यासाठी तसेच तपासात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस विभागास अत्याधुनिक न्यायवैद्यक वाहनाचे वितरण करण्यात आले. सध्या गुन्हेगार अत्याधुनिक पध्दतीचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्याची उकल करतांना तपास यंत्रणेस बरेच अडथळे पार करावे लागतात. गुन्हा उघडकीस आल्यावरही तपासात संसयितांविरुध्द ठोस पुरावे, शास्त्रीय पध्दतीचा वापर करून पुरावे संकलित न केल्यास गुन्हेगार न्यायालयातून सहीसलामत सुटतात. त्यामुळे गुन्हे सिध्दतेच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर घसरण होत असते.
पोलीस तपास पथकास गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावर आढळून येणारे सुक्ष्म पुरावे जमा करण्यास या वाहनामुळे मदत होणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करत तपासकामात मदत होईल.
जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्यास न्यायवैद्यक वाहन महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक पथकाकडील वाहनात सहायक रासायनिक विश्लेषक हे त्यांच्या कडील सामग्रीहसह हजर राहणार असून हातांचे ठसे तपासणाऱ्या पथकातील अधिकारीदेखील राहणार आहेत. युनिटमधील वाहनात गुन्ह्याच्या तपासकामासाठी वैज्ञानिक व भौतिक पुरावे गोळा करण्यात मदत होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक न्याय वैद्यक वाहनामध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील सहायक रासायनिक विश्लेषक हे त्यांच्या कडील अत्याधुनिक किट सह हजार राहणार असून ठसे तज्ञ पथकाकडील अधिकारी देखील असतील. या युनीट मधील वाहनात गुन्ह्याच्या तपासकामासाठी वैज्ञानिक व भौतीक पुरावा गोळा करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक पध्दतीने शोध साहित्य देण्यात आले आहे. तसेच वाहनात छायाचित्रकार व प्रशिक्षीत कर्मचारी तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील सहायक विश्लेषक असे हजर राहणार आहेत. त्यामुळे गुन्हा घडल्यावर गुन्ह्याची उकल करण्यास तसेच आरोपी विरूध्द भौतीक, जैविक व वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी या पथकाची व भ्रमणध्वनी फॉरेन्सीक वाहनाची विशेष मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.