नाशिक – पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कशी कमी करता येईल यासह आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच इतर प्रश्नांवर काम करतांना डिजिटालायझेशनवर भर देण्यात येईल, अशी माहिती नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकमध्ये २००३ मध्ये काम केले आहे. लवकरच कुंभमेळा येत असून तो यशस्वीरित्या पार पडावा, यासाठी आमचे प्रयत्न असतील. नागरिक आणि पोलीस यांच्यात असलेली दरी कमी व्हावी यासाठी काम करणार आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करतांना डिजिटालायझेशन उत्तम पर्याय असू शकेल. या अनुषंगाने विविध प्रणाली राबविण्यात येईल. अभ्यागंतासाठी पालघरच्या धर्तीवर वेगळी प्रणाली राबवत त्यांच्याकडील अभिप्राय पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवला जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.