नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सातत्याने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. यात जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये २० हजार ७४० तर नगरमध्ये ४६ हजार ५३९ नव मतदारांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, यासाठी नियमितपणे प्रयत्न केले जातात. नवमतदार आणि युवा वर्गावर मुख्यत्वे लक्ष केंद्रीत करण्यात आले. महाविद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लबमार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याची फलश्रृती नव मतदारांच्या नोंदणीत नाशिक आघाडीवर राहण्यात झाली. नाशिक जिल्ह्यात एकूण ४७ लाख ९८ हजार ३७० मतदार आहेत. यात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची टक्केवारी १.४१ इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात हेच प्रमाण १.६४ टक्के, जळगाव १.४० टक्के, धुळे १.३४ आणि नगर जिल्ह्यात १.२८ टक्के आहे. नवमतदारांच्या नोंदणीत जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. नंदुरबारमध्ये तुलनेत कमी नोंदणी झाली.

Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

युवा मतदार किती ?

विभागात २० ते २९ या वयोगटातील मतदारांची एकूण संख्या २९ लाख ३६ हजार ५१ इतकी आहे. यात नाशिक जिल्ह्यात नऊ लाख १४ हजार ९८२ मतदार आहेत. नंदुरबार २९७७३६, जळगाव ६८७५०४, धुळे ३४३२६९, नगर ६९२५६० मतदारांचा समावेश आहे. या वयोगटातील सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यात आहेत. टक्केवारीचा विचार करता नाशिक जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये युवा मतदार १९ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक २३.६ टक्के, जळगाव १९.५, धुळे जिल्ह्यात १९.५ अशी टक्केवारी आहे.