नाशिक : हरित लवादाने पेट्रोल पंप उभारताना निवासी क्षेत्रापासून ५० मीटर अंतर असणे बंधनकारक केले असताना शहर परिसरात नव्या पेट्रोल पंपाला परवानगी देताना या निकषाचे प्रशासनाकडून सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आक्षेप पेट्रोल पंप वितरकांच्या नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने नोंदविला आहे. या संदर्भात खबरदारी न घेतल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा गंगापूर रोडवरील गीता लॉन्स येथे भूषण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व ऑइल कंपन्यांचे पेट्रोल पंप वितरक उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष उदय लोध, राष्ट्रीय संघटनेचे सचिव के. सुरेश कुमार, राज्याचे सचिव अमित गुप्ता हे उपस्थित होते. सभेत लोध, गुप्ता, सागर रूकारी, शुभम छाजेड यांनी पेट्रोल पंप चालवताना घ्यावयाची काळजी, उपाय यावर मार्गदर्शन केले. सभेत संघटनेचे सदस्य हेमंत धात्रक आणि भूषण भोसले यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

हेही वाचा…नंदुरबार : श्रीकांत शिंदे यांनी दादा भुसे, उदय सामंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरविले, कारण…

पेट्रोल पंपाला लागणाऱ्या व पूरक असणाऱ्या विविध वस्तू व सेवांचे दालन सभागृहात लावण्यात आले होते. वार्षिक सभेत विविध ठराव करण्यात आले. कार्यकारिणी संख्या वाढवण्यासाठी घटना दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. जैवइंधन व अवैध डिझेल यांची बेकायदेशीर विक्री कुठे होताना आढळल्यास संघटना कायदेशीर मार्गांचा अवलंब करून त्यास अटकाव करेल, असाही ठराव करण्यात आला. टँकरद्वारे इंधन वाहतुकीत चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निश्चित झाले.

नवीन पंपाला परवानगी देताना राष्ट्रीय हरित लवादाने निवासी क्षेत्रापासून ५० मीटर अंतर असावे अशी अट टाकली आहे. या बाबीचे उल्लंघन प्रशासनाकडून सतत होत असल्याने त्या बाबत प्रशासनाला पुन्हा एकदा याची जाणीव करून देणे व त्यासंबंधी खबरदारी न घेतल्यास प्रसंगी कायदेशीर मार्गांचा देखील अवलंबन करणे असाही ठराव मंजूर करण्यात आला. वितरकांविषयी केंद्रीय संघटनांच्या बैठकीमध्ये इंधन कंपन्यांकडून योग्य निर्णय न घेतले गेल्यास केंद्राने व राज्याने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभा यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष नितीन धात्रक, साहेबराव महाले, समीर कपूर, रवी ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा…नाशिक : ग्रामीण भागात लुटमार करणाऱ्या तीन जणांना पोलीस कोठडी

अध्यक्षपदी विजय ठाकरे

नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विजय ठाकरे, उपाध्यक्षपदी दिनेश धात्रक, राजेश पाटील, तेहसिन खान यांची निवड झाली. सचीवपदी अमोल बनकर, सहसचिव – मनोज चांडक, खजिनदार – सुदर्शन पाटील, सहखजिनदार – नीलेश भंदुरे आदींचा समावेश आहे

…अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स संघटनेच्या (फामपेडा) बैठकीत सात वर्षापासून प्रलंबित असलेले डीलर मार्जिन न्यायालय प्रकरण, इंधन कंपन्यांकडून होणारी पिळवणूक व इतर अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. सर्व राष्ट्रीय संघटनांची इंधन कंपन्यांसोबतच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, फामपेडाचे सदस्य येथे जमले होते. जर इंधन कंपन्यांच्या बैठकीत आपली बाजू योग्य पद्धतीने ऐकून घेतली गेली नाही व काही चुकीचा निर्णय थोपण्याचा प्रयत्न झाला. तर आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीत राज्याची संपूर्ण कार्यकारिणी तसेच जिल्हा संघटनांचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.