नाशिक : जिल्ह्यात लुटमार करणाऱ्या तसेच रस्त्याने जाणाऱ्यांचे भ्रमणध्वनी खेचणाऱ्या तीन जणांना बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्हेगारांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. विनेश निकम हे दुचाकीने कारवेलकडे जात असताना त्यांनी एकाला पत्ता विचारला. त्यावेळी भगवान करगळ (३०, रा. संवदगाव), किरण गवळी (२४, रा. जळगाव फाटा), देवा शिंदे (१९, रा. भरडवस्ती) यांनी निकम यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील सात हजार रुपयांचा भ्रमणध्वनी, तीन हजार ५० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत केला.

दुसऱ्या घटनेत, पंकज भामरे हे रस्त्यावर उभे राहून भ्रमणध्वनीवर बोलत असतांना संशयितांनी त्यांच्याजवळ येत औंदाणे कोठे आहे, असे विचारले. भामरे माहिती देत असताना दुचाकीवरील तीन संशयितांपैकी एकाने भामरे यांच्या हातातील १९ हजार रुपयांचा भ्रमणध्वनी हिसकावून घेत पोबारा केला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून

हेही वाचा : भिशीचे आमिष जळगावातील १३ महिलांना पडले महागात

तिसऱ्या घटनेत, कृष्णा माळी (२६) हे टेहरे चौफुली येथून पायी जात असताना दुचाकीने आलेल्या दोन संशयितांनी त्यांना बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवले. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने जखम करत त्यांच्या खिशातील ७०० रुपये आणि भ्रमणध्वनी बळजबळीने हिसकावून घेतला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत सागर बोरसे (१९, रा. कळवण) हे दरेभणगी शिवारात पाहुण्यांची वाट पाहत असतांना दुचाकीने आलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील १४ हजार ४९९ रुपयांचा भ्रमणध्वनी बळजबरीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नंदुरबारमध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाइन फिवर, आजपासून कलिंग प्रक्रिया

दरम्यान, जायखेडा पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करुन तीनही संशयितांना ताब्यात घेतले. याविषयी सहायक निरीक्षक शिरसाठ यांनी, संशयितांपैकी भगवान करगळ हा सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. किरण गवळीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. संशयितांनी सटाणा, जायखेडा, देवळा आणि कळवण येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. जबरी चोरी करणाऱ्यांमधील दोन सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रस्त्याने पायी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या एकट्या व्यक्तीला गाठून शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी ते करत असत. एखादी महिला असेल तर तिच्याशी गैरवर्तनही केले जात होते. पोलीस चोरट्यांकडून अन्य माहिती मिळवायचा प्रयत्न करत आहेत.