देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील लवटेला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संशयित हा शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या, तर माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे.

देवळाली कॅम्प, नाशिकरोड परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेत दोन गट पडले असून त्यांच्यातील राजकीय संघर्ष वेगळ्या वळणावर गेला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. शिवजयंतीच्या नियोजनासाठी देवळाली गावातील गणपती मंदिराजवळ सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

हेही वाचा – जळगावात दोन दिवस पाणीबाणी, जलवाहिनी जोडणीमुळे पुरवठा बंद

शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटात सहभागी झालेल्या लवटे गटाचे वर्चस्व आहे. यावेळी तक्रारदार सागर कोकणे आणि अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक भय्या मणियार यांनी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याकडे गेल्यावर्षीचा शिवजयंतीचा हिशेब मागितल्यावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांवर धाऊन गेले. यावेळी लवटे यांचा मुलगा स्वप्नीलने पिस्तूल काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनाक्रमाने परिसरात धावपळ उडाली. दुकाने बंद झाली. पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अतिरिक्त कुमक मागवली गेली. जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे देवळाली गाव, नाशिकरोड परिसरात तणाव पसरला होता. दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित स्वप्नील लवटेला अटक करण्यात आली.

हेही वाचा – जळगावसाठी ध्वनिक्षेपक वापरास सवलत देण्याचे दिवस जाहीर

गुन्ह्यात वापरलेले पिस्तुलही हस्तगत करण्यात आले. संशयितास शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे ठाकरे व शिंदे गटात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अलीकडेच ठाकरे गटातून १२ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. नंतर पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे पक्षांतर सुरू झाले. या काळात राजू लवटे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी निवड झाली होती. राजकीय समीकरणे लक्षात घेत माजी नगरसेवक मणियार हे ठाकरे गटात दाखल झाले. परस्परांना शह देण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू झाले असून देवळाली गावातील वाद हा त्याचाच भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.


गुन्हेगारांवर कठोर कारवाईची तयारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्या अंतर्गत गुन्हेगारांवर वेळप्रसंगी मोक्कासारखी कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.