जळगाव जिल्ह्यासाठी २०२३ मध्ये ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक आदींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे व तरतुदीचे पालन करून सकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत सवलत देण्याचे १५ दिवस जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी जाहीर केले आहेत.

हेही वाचा- नाशिक : गुटख्यासाठी सुरगाण्यातील जंगलातून खैराची तस्करी

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय) एक दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एक दिवस, गणेशोत्सव तीन दिवस (पाचवा, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी), ईद-ए-मिलाद, नवरात्रोत्सव एक दिवस (अष्टमी), दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस एक दिवस, ३१ डिसेंबर वर्षअखेर एक दिवस याप्रमाणे नऊ दिवस, तर उर्वरित सहा दिवसांची परवानगी राखीव ठेवली असून, जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा- नाशिक : वेळूंजे विभागात वणव्यामुळे वृक्षसंपदेची हानी; वारंवार लागणाऱ्या आगी रोखण्याची गरज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र शासनाच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनिमर्यादेचे व तरतुदीचे उल्लंघन होणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपयोजना करावयाच्या अटी व उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनिप्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशातील बाबींचे पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत ध्वनिप्रदूषण नियम २००० चे पालन करावे. नियमातील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा दंडाधिकारी मित्तल यांनी आदेशात दिला आहे.