काही दिवसांपासून सुरु झालेली नैसर्गिक संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील कजवाडे येथे पुन्हा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पॉलीहाउस, माध्यमिक शाळा, घरांची पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली. महसूल यंत्रणेने या नुकसानीचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा >>> नाशिक : घोरवड घाटात तीन वाहनांचा अपघात; दोनजण गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा या तालुक्यांमध्ये दोन-अडीच महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे या संकटांना तोंड द्यावे लागले. यामुळे काढणीला आलेल्या शेत पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. सततच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना मालेगाव तालुक्यातील कजवाडे भागात पुन्हा वादळी वाऱ्याचे संकट ओढावले. कजवाडे येथील मिनाबाई ठाकरे यांच्या शेतातील पाॅलीहाउस वादळाने कोसळले. या वादळाने लोखंडी खांब अक्षरश: वाकून गेले. कागदही खराब झाल्याने जवळपास १५ लाखाचे नुकसान झाले आहे. माध्यमिक शाळेतील खोल्यांच्या छतावरील पत्रे उडून गेली. वादळाच्या तडाख्यात तेथील भिंतीही पडल्या. याशिवाय गावातील हरी कापडणीस, विजय कापडणीस, राजेंद्र कापडणीस, हरी बोरसे, रामदास सुळ यांच्या घरांची वादळाने पडझड झाली आहे. तलाठी गोविंद तिडके यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.