नाशिक शहर परिसरात एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाआरती, वाहनांवर झेंडे लावत शहरात फिरणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे यासह अन्य काही बाबींवर निर्बंध आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

हेही वाचा- नाशिक : दुरुस्ती कामामुळे ओझरहून विमानसेवा काही दिवस बंद

शहर परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, राजकीय वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, वापर करणे, जमा करणे, तयार करणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्रांचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन तसेच प्रतिमेचे दहन करणे, अर्वाच्च घोषणा देणे, सभ्यता अगर नितीमत्तेस धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथविण्यास प्रवृत्त करेल असे आवेशपूर्ण भाषण करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे, अशा कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- नाशिक: येवला तालुक्यात पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याने सहा जण जखमी

सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजवणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास तसेच पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.