सिन्नर-शिर्डी रस्त्यावर सोमवारी रात्री एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात पिता-पुत्रांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जितेंद्र तांडे आणि त्यांचा मुलगा आदित्यकुमार जितेंद्र तांडे (८) अशी मृतांची नावे आहेत. मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरात वास्तव्यास असणारे तांडे काही कामानिमित्त मुलगा जितेंद्रला घेऊन दुचाकीवरून निघाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्री दहाच्या सुमारास ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र तांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा आदित्यकुमार हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, या अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. गंभीर जखमी असणा-या आदित्यकुमारला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident in nashik father and son died
First published on: 02-01-2017 at 16:18 IST