नाशिक – केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील २४ हजार ९८२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “कधी पावसात भिजणे, कधी रडणे, कधी आजारी पडणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न”, गिरीश महाजनांची टीका

हेही वाचा – शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने महायुतीच्या अडचणीत भर

या परीक्षेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी साक्षरता वर्ग घेण्यात आले. स्थलांतरीत, शेतमजूर तसेच अन्य प्रौढ व्यक्तींना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. या प्रौढ साक्षरता वर्गाची १७ मार्च रोजी परीक्षा झाली. कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोन हजार ६८६ केंद्रावर असाक्षर परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. एकूण २४ हजार ९८२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून २३३ परीक्षार्थींना सुधारणा आवश्यक म्हणून घोषित करण्यात आले आहे. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम नियामक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व कार्यकारी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अहिरे यांनी नमूद केले आहे.