जिल्ह्यातील चांदवड आणि मालेगाव तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीत पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांदवड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, किरण महाले हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना बंद घर पाहून चोरांनी घरातील कोठीत ठेवलेली रोख रक्कम, तसेच दागिने असा पाच लाख, ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या घटनेत हेमंत घोडके हे हॉटेल बंद करून घरी गेले असता चोरट्यांनी हॉटेलची खिडकी तोडून अंदाजे ६३, ८७५ रुपयांच्या मद्याच्या बाटल्या चोरल्या. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – नाशिक : हमालवाडीतील खून प्रकरणी दोन अल्पवयीन संशयित ताब्यात

हेही वाचा – “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा भाजपाला प्रश्न

तिसरी घरफोडी मालेगाव परिसरात झाली. जीवन हिरे यांचे बंद घर संशयित कुलदिप पवार (रा. मालेगाव) आणि अन्य संशयितांनी संगनमत करून फोडले. कपाटात ठेवलेले एक लाख, ४० हजार रुपये चोरण्यात आले. मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत नीलेश पाचोरकर यांचे दुकान फोडण्यात आले. नऊ हजार रुपयांची पाण्याची मोटार, चार हजाराचा विद्युत पंप, तीन हजारांची वीज मोटार, तीन हजार ५०० रुपयांची पाण्याखालची मोटार आदी ४६००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in five house nashik district goods worth lakhs looted ssb
First published on: 24-01-2023 at 19:15 IST