मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित दिवाळी अंक २०१७ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेच्या ‘साहित्य सावाना’ ने प्रथम पुरस्कार मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या समारंभात संस्थेस सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप ३७,५०० रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ असे आहे. साहित्य सावानाचे संपादक श्रीकांत बेणी, वाचनालयाचे कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, उपाध्यक्ष किशोर पाठक, साहाय्यक सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे, सांस्कृतिक कार्यसचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, वसंत खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्पर्धेत ४५० दिवाळी अंक सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘हे थेंब अमृताचे’ हे विविध दिवाळी अंकांतील उत्कृष्ट कथांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya savana diwali ank state level award
First published on: 01-09-2018 at 03:05 IST