नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यासाठी त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र त्यांनी अर्ज न भरता त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आज सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांना शुभांगी पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीबाबत विचारलं असता, त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – कर्नाटकात जाऊन देवेंद्र फडणवीसांची थेट कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले…

काय म्हणाले सत्यजीत तांबे?

”महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघ या संघटनेनं मला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय शिंदे यांचे आभार मानतो. नाशिकमधून मी अपक्ष लढत असलो, तरी विविध संघटनांचा मला पाठिंबा आहे. सुधीर तांबे यांनी गेल्या १५ वर्षात शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांचे मन जिंकण्याचं काम गेल्या १५ वर्षांत केलं. त्याचा परिणाम म्हणून हे सर्व जण माझ्या पाठिशी उभं राहत आहेत, याची मला जाणीव आहे. हे काम पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल”, अशी प्रतिक्रियाही सत्यजीत तांबे यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : “सिकंदर शेखवरून द्वेषाचं…”,महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर अजित पवारांचं वक्तव्य

राजकारणावर योग्यवेळी बोलेन

यावेळी भाजपाच्या पाठिंब्याबद्दल विचारलं असता, ”मला टीडीएफने, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे. गेल्या सात आठ दिवसांत बरचं राजकारण झालं आहे. या राजकारणावर आम्ही योग्यवेळी सविस्तरपणे बोलू”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा…”, सत्यजीत तांबेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”याबाबत मला कल्पना नाही”

दरम्यान, काल नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या माघारी फिरावे लागले होते. याबबत विचारलं असता, त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ”याबाबत मला कल्पना नाही”, असं ते म्हणाले.